Ad will apear here
Next
पाली भाषेतील पहिल्या भारतीय लघुपटाची निर्मिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
पाली भाषा दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली भाषा विभागात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. प्रदीप गोखले व पाली भाषा विभागप्रमुख प्रा. महेश देवकर.पुणे : पाली भाषेतील पहिला भारतीय लघुपट नुकताच तयार झाला असून, तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. पाली भाषा दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या पाली भाषा विभागात १७ सप्टेंबर रोजी त्याचे सादरीकरण करण्यात आले. ‘नक्खत्त जातकं’ असे त्या लघुपटाचे नाव आहे. लवकरच तो सर्वांसाठी प्रदर्शित केला जाणार आहे.

पाली भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. प्रदीप गोखले, पाली भाषा विभागप्रमुख प्रा. महेश देवकर व अॅड. गौतम चाबुकस्वार.
विद्यापीठाच्या पाली भाषा विभागाचे विद्यार्थी ओशोनिक चाबुकस्वार आणि रोहेन जाधव यांनी हा लघुपट तयार केला आहे. ‘‘अनागरिक धम्मपाल’ यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर २०१८ रोजी ‘पाली भाषा दिन’ साजरा करण्यात आला. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रथम हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. त्याची निर्मिती ‘वज्रसत्त्वा फिल्म्स’ने केली असून, दिग्दर्शन ओशोनिक आणि रोहेन यांनी केले आहे. यातील मुख्य भूमिका सुदीप गायकवाड यांनी साकारली आहे. ‘नक्खत्त जातकं’ या जातक कथेवर आधारित असलेला हा लघुपट दहा मिनिटांचा आहे. प्राध्यापक डॉ. मृगेंद्र प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार करण्यात आला आहे. लवकरच तो सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती पाली भाषा विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर यांनी दिली.  

या लघुपटाच्या सादरीकरणावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, पाली भाषा विभागप्रमुख प्रा. महेश देवकर, अॅड. गौतम चाबुकस्वार, प्रा. प्रदीप गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. ‘भगवान बुद्धांचे विचार या भाषेतून शिकत आहात, ते सर्वांपर्यंत पोहोचवा’, असे आवाहन डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी, बौद्ध धर्माचा ठेवा जतन करण्यासाठी हा विभाग करत असलेल्या कामाचे, तसेच या विद्यार्थ्यांनी केलेल्या लघुपटाचे त्यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, ‘ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवत असताना दुराग्रही भूमिका घेऊन उपयोग नाही. मस्तिष्काकडून हृदयापर्यंत जाण्याऐवजी हृदयापासून मस्तिष्कापर्यंत गेले पाहिजे. प्रेमभावना ठेवून ज्ञानाचा प्रचार केला तर ते सर्वांपर्यंत पोहोचेल.’

या वेळी डॉ. साळुंखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZIIBS
Similar Posts
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये उच्चशिक्षणामधील बदलासंबंधी कार्यशाळा कुसगाव : ‘कालानुरूप उच्च शिक्षणामधील बदल’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद व अधिसभेची कार्यशाळा पार पडली.
रत्नाई महाविद्यालयात व्याख्यानमाला उत्साहात पुणे : हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे रत्नाई महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान, स्पर्धात्मक परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन या विषयांवर नुकतीच व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
मुलांनी बनवलेल्या ‘बायसिकल’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड पुणे : शालेय विद्यार्थ्यांनी ‘अविष्कार सायन्स क्लब’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सायन्स पार्क’च्या सहकार्याने निर्माण केलेल्या ‘बायसिकल’ या विज्ञान लघुपटाची भारत सरकारच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय ‘सायन्स लिटरेचर अँड फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. हा महोत्सव लखनऊ येथे सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘रिसर्च आविष्कार’ स्पर्धा पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नुकतीच ‘रिसर्च आविष्कार’ स्पर्धा पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागचे प्रमुख डॉ. रवींद्र जायभाय आणि एस. एम. जोशी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील डॉ. शरद पासले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language